पाहिलं पहिल्यांदाच मी तुला
अन मन तुझ्यात गुंतून गेलं ...
ओळख तर अपुली जुनीच होती
तरी नव्यानं एकमेकांना पाहण झालं
तुझ्या गालावरच स्मित
अन नकळत झालेला स्पर्श ,
मन कसं प्रीतीत रंगून गेलं ...
तुझं बघणं, तुझं हसणं, तुझं बोलणं
कशा मनमोहक होत्या त्या अदा
पाहता पाहता तुझं हे नव रूप
मन अलगद सांगून गेलं ...
प्रिया ही तुझी, हीच स्वप्नपरी,
अलगद शिरलीस पसरल्या बाहुत,
लहरल्या बटा चेहऱ्यावर माझ्या
मन कसं बेधूंद झालं ...
काही क्षणांची ती भेट सरली
निसटले हातून ते क्षण
पुनर्भेटीच्या आशेने
मन तुझ्याच विचारात गढून गेलं ...
प्रसाद गोडांबे