Friday, 25 December 2020

 एक दिवस स्वप्नातला असा असावा

मस्त गुलाबी थंडीतली सकाळ असावी

गधं बहरला प्राजक्त असावा

साथीला फक्त सखे,  तू सवे असावी

हातात गरमागरम चहाचा कप असावा

सोबत तुझ्या नजरेची उब असावी

शब्दांना तिथे मुळी थारा नसावा

मुक्या भावनांची भाषा असावी

श्वासांना एकमेकांचा भास असावा

अधरांवर अमृताची चव असावी

उगवतीच्या किरणांचा स्पर्श असावा

सोनसकाळी फुलणारी अपुली प्रीत असावी..

                          -प्रसाद गोडांबे


Thursday, 17 December 2020

 सांज येता अंगणी

तुझा हा ऋतू नभ पांघरतो

शांत एकांत समयी

वारा हा कसा आक्रंदतो

क्षितिजा वरून डोकाऊनी

रवीही पाहतो अन शशीही पाहतो

गडे ..सहवासात

केंव्हातरी गंध तुझा असा भिनतो

मी माझा न उरतो.. मी माझा न उरतो...

                              प्रसाद गोडांबे

Wednesday, 4 November 2020

बदलतोय आता मी स्वतःला

कारण ..

इथे 'ध' चा 'मा' होतोय

अन अर्थाचा अनर्थ

शोधतोय आता मी स्वतःला

कारण..

कुणी म्हणती फ्लर्ट

कुणा वाटे चालू

समजावतोय आता मी स्वतःला

कारण..

किंमत नाही भावनांना

विचारतो कोण प्रेमाला

बजावतोय आता मी स्वतःला

कारण ..

प्रेम एकतर्फी नसावं

ते दोघांचं ही असावं

बदलतोय आता मी स्वतःला

कारण..

तुझी इच्छा नसताना

उगा हट्ट कशाला

        -प्रसाद गोडांबे





Saturday, 10 October 2020

 मोगरा ही तेंव्हाच फुलतो , 

जेंव्हा तू गाली हसतेस .

केवडा ही तेंव्हाच दरवळतो ,

जेंव्हा तू गीत गातेस .

कुमुदिनी ही तेंव्हाच डुलते ,

जेंव्हा तू प्रसन्न दिसतेस .

अबोली ही धुंद होते , 

जेंव्हा तू गजरा माळतेस .

रातराणी ही गधं विसरते , 

जेंव्हा तू मंचकी पहुडतेस .

चाफा ही अबोल होतो , 

जेंव्हा तू लाजतेस . 

प्राजक्त ही सडा सांडतो , 

जेंव्हा तू सुखावतेस .

जणू फुलं  तुझं दास्य स्विकारतात ,

अन तूच त्यांची फुलराणी बनतेस .

                  - प्रसाद गोडांबे

Saturday, 3 October 2020

*आभार*

 आभार त्यांचे ज्यांनी मला प्रेम दिलं , 

आभार त्यांचेही ज्यांनी मला अव्हेरलं .

आभार त्यांचे ज्यांनी मला जवळ केलं ,

आभार त्यांचेही ज्यांनी मला दूर लोटलं .

आभार त्यांचे ज्यांनी मला हसणं शिकवलं ,

आभार त्यांचेही ज्यांनी मला रडणं शिकवलं.

आभार त्यांचे ज्यांनी मला सदैव साथ केलं , 

आभार त्यांचेही ज्यांनी मला अर्ध्यावर सोडलं.

आभार त्यांचे ज्यांनी मला मोहात पाडलं , 

आभार त्यांचेही ज्यांनी मला मोहातून सोडवलं.

आभार त्यांचे ज्यांनी मला स्वप्नात गुंगवलं ,

आभार त्यांचेही ज्यांनी मला स्वप्नातून जागं केलं.

आभार त्यांचे ज्यांनी मला समजून घेतलं ,

आभार त्यांचेही ज्यांनी मलाच आरोपी केलं .

आभार त्यांचे ज्यांनी मला आपलं केलं , 

आभार त्यांचेही ज्यांनी मला परकं केलं .

आभार त्यांचे ज्यांनी मला वाचलं ,

आभार त्यांचेही ज्यांनी मला नजरंदाज केलं .

आभार त्यांचे ज्यांनी मला ' Top Fan ' केलं ,

आभार त्यांचेही ज्यांनी मला ' Block ' केलं .

सखी असो वा सखा .असो कुणी नात्यागोत्यातलं ,

आभार त्या सगळ्यांचेच ज्यांनी मला जगणं शिकवलं .

                                   -प्रसाद गोडांबे


Thursday, 24 September 2020

  

हूआ दीदार जो आपका

चाँद को हकिकत में 

पा लिया हमने ...

लम्हे ठहर गये और

ख्वाब को हकिकत में

पा लिया हमने ...

गलें से जो लगा लिया आपने

स्वर्ग को धरती पर हीं

पा लिया हमने ...

इष्क की इन वादीयों में

दिल की गहराइयों को

पा लिया हमने ...

       -प्रसाद गोडांबे



Tuesday, 22 September 2020

 " कोण मी ....

ह्यावर नसे हक्क कुणाचा

तरी कयास तो एक मनाचा

हवे होते मी व्हायला

काटा गुलाब देठीवरला

तू फुलावं .....

आनंदाने हसत जगावं

अन मी .....

दुःख तुझ्या वाट्याचं भोगावं ."

                 -प्रसाद गोडांबे