आले माझे बाप्पा आज घरी
सोबतीला त्यांच्या मूषकाची स्वारी
मूर्ती तयाची अती साजीरी
दोंदील तनु ते शोभे भारी
वाजत गाजत गणराज आले
त्रिभूवन अवघे आनंदी झाले
रूप पाहता देखणे , मन हरपले
चरणी तयाच्या मस्तक ठेवियले
विघ्नहर्ता विघ्ने आमची हरावी
करुणालया करुणा तुझी असावी
तुझ्या कृपेने दुःखें अवघी नासावी
हेरंबा गणनायका तूच आम्हा तोषवी
प्रेमे करूनी पाद्य पूजा
मोदक अर्पूनी नैवेद्यासाठी
तुझा हा 'प्रसाद ' विनवीतो तुजला
बुद्धीच्या नायका बुद्धी देई मजला
प्रसाद गोडांबे 🙏