ती सकाळ..
कशी ...
रोजच प्रसन्न आल्हाददायक असते
ती सकाळ..
कशी...
गुलाबी थंडीत दवबिंदूची नक्षी काढलेल्या
धुक्याच्या दुलइतुन डोकावते
ती सकाळ..
कशी...
रिमझिम पावसात मोरा सारखी
थुईथुई नाचते
ती सकाळ..
कधी...
उन्हाळ्यात सोनेरी सूर्यकिरण
अंगावर घेऊन बागडते
ती सकाळ..
कधी...
झालं गेलं विसरून नित्य नव्याने
दिवसाची सुरुवात करते
ती सकाळ..
सकाळ...
ही नित्याचीच असते तरीही
रोज बदलणाऱ्या परिस्थितीला कसं
प्रसन्नपणे हासत सामोरे जायचे
हे आपल्याला शिकवत असते
ती सकाळ...