Thursday, 24 September 2020

  

हूआ दीदार जो आपका

चाँद को हकिकत में 

पा लिया हमने ...

लम्हे ठहर गये और

ख्वाब को हकिकत में

पा लिया हमने ...

गलें से जो लगा लिया आपने

स्वर्ग को धरती पर हीं

पा लिया हमने ...

इष्क की इन वादीयों में

दिल की गहराइयों को

पा लिया हमने ...

       -प्रसाद गोडांबे



Tuesday, 22 September 2020

 " कोण मी ....

ह्यावर नसे हक्क कुणाचा

तरी कयास तो एक मनाचा

हवे होते मी व्हायला

काटा गुलाब देठीवरला

तू फुलावं .....

आनंदाने हसत जगावं

अन मी .....

दुःख तुझ्या वाट्याचं भोगावं ."

                 -प्रसाद गोडांबे

Friday, 18 September 2020

 मी समजू शकतो

तुझं मनातल्या मनात हसणं

आणि मध्येच..

काहीसं अवघडणं

तुझ्याच ओठात फुलतं

माझ्या मनातील गाणं

आणि समोरून

माझं चोरून पाहणं..

         -प्रसाद गोडांबे


Thursday, 17 September 2020

 बघ जमतंय का 

माझं मन ओळखणं ..

अन अचूक पणे

भाव त्यातले टिपणं..

अपेक्षीतो मी

तू स्वतःहून पुढे येणं..

आग माझा तर

छंदच स्वप्न पाहणं...

    - प्रसाद गोडांबे

Wednesday, 16 September 2020

 जानकर भी अनजान बनना

ये आपका अंदाज नहीं 

चाह कर अनचहा करना

ये आपकी फितरत नहीं

नजरे आपकी बयान करती हैं

हमसे नजरे चुराना नहीं 

इश्क की इस गहराईयों में

दामन कभी छोडना नहीं

          -प्रसाद गोडांबे



Thursday, 10 September 2020

 खूप झाले बोलणे आता नजरेने

आहे स्पर्षसुखा आतुर मी

स्पर्श नको नुसता ओझरता

कोणत्या बहाण्याने का होईना

घ्यावास माझा कर तुझ्या करी..

इशारत ही जाणोनि

फुलावा प्रीतीचा गुलमोहोर

शिरशिरी सळसळ नसानसांत

धडधड उरी वाढावी

घ्यावास माझा कर तुझ्या करी..

वेळ आता दवडूनको

अंत आता पाहू नको

दोन पाऊले पुढे मी

तू ही येवोन हरोहरी

घ्यावास माझा कर तुझ्या करी..

                      प्रसाद गोडांबे

Saturday, 5 September 2020

 बोलणं आपलं सारं 

ते नजरेने

परी भाव अंतरीचे

जाणले मनाने

शब्दाविना खेळ सारा

पहावे तू प्रेमाने

असावा प्रतिसाद माझा

तोही मुक्याने

लाजूनी आरक्त व्हावे

तुझिया गालाने

हलकेच थरथरावें

तुझिया ओठांने

चेहऱ्याची भाषा ओळखावी

ती नजरेने

अन नजरेचे भाव ओळखावे

ते मनाने

               प्रसाद गोडांबे