Wednesday, 27 June 2018

गंध तुझ्या ओंजळीतल्या मोगर्याचा
आसमंत भारूनी गेला
हलकेच पांघरलेस तू मला
अन श्वास श्वासात गुंतूनी गेला
           रेशमी मिठीत तुझ्या आज
           ऋतू रंग सारे उधळूनी गेला
           धुंद तू अन धुंद मी
           चांद चांदणे शिंपूनी गेला
राञ ही संपणार नाही 
मदन रंगी रंगूनी गेला
प्रीत ही बावरली अशी 
आणि गजरा कुस्करूनी गेला
            तू तशी आणि मी असा हा
            पाऊस पुन्हा बरसूनी गेला
            सुखांनी तृप्त या श्वासांना
            पहाटवारा जोजवूनी गेला

4 comments:

  1. अतिशय सुंदर कविता

    ReplyDelete
  2. Rhymes are so good,
    Really great one...
    Keep it up n share more..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...आपली ओळख समजली असती बरं वाटलं असत

      Delete
  3. एक नंबर भाऊ .... शब्द रचना चांगली झाली आहे

    ReplyDelete