तुझं प्रेमच मला उमजत नाही
तू मात्र दुसरी कडेच बीजी..
काय समजावे कळतच नाही
तुझं प्रेमच मला उमजत नाही
माझ्या पेक्षा तो आहेच लकी
त्याच्या पुढे माझी ती काय लायकी
तो असता माझं अस्तित्वचं नाही
तुझं प्रेमच मला उमजत नाही
तो असता पापणी न लवते
मी असता गाढ झोप लागते
बाजूला आहे मी हे स्वप्नीही नाही
तुझं प्रेमच मला उमजत नाही
विश्वास आहे तुझ्यावर तरीही
माझ्याच प्रेमाची आस तुलाही
तुझं प्रेमच मला फक्त उमगतं
अन तुझ्या ठाई ठाई दिसतं
घाबरू नको तो दुसरा तिसरा कुणी नाही
हाच तो तुझा मोबाइल आहे
त्याला थोडे सार बाजूला
बहर येईल आपुल्या प्रीतीला
प्रसाद गोडांबे
आहे म्हणावं तर दिसत नाही
माझी कायम तुझ्या भोवती रुंजीतू मात्र दुसरी कडेच बीजी..
काय समजावे कळतच नाही
तुझं प्रेमच मला उमजत नाही
माझ्या पेक्षा तो आहेच लकी
त्याच्या पुढे माझी ती काय लायकी
तो असता माझं अस्तित्वचं नाही
तुझं प्रेमच मला उमजत नाही
तो असता पापणी न लवते
मी असता गाढ झोप लागते
बाजूला आहे मी हे स्वप्नीही नाही
तुझं प्रेमच मला उमजत नाही
विश्वास आहे तुझ्यावर तरीही
माझ्याच प्रेमाची आस तुलाही
तुझं प्रेमच मला फक्त उमगतं
अन तुझ्या ठाई ठाई दिसतं
घाबरू नको तो दुसरा तिसरा कुणी नाही
हाच तो तुझा मोबाइल आहे
त्याला थोडे सार बाजूला
बहर येईल आपुल्या प्रीतीला
प्रसाद गोडांबे
Mast👌👌
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteपण आपण कोण ते समजलं तर बरं होईल
Delete