प्रसाद गोडांबे
कवितेत माझ्या तू तुलाच पाहतेस
आठवणींच्या हिंदोळ्या वरती झुलतेस
तेंव्हाच तू माझी कविता होतेस
या पेक्षा सुखं अजून ते काय पाहिजे
नजर बोलकी तुझी ही सांगते
गालावरची खळी खुणावते
अजूनही तू माझ्या प्रेमात न्हाहते
या पेक्षा सुखं अजून ते काय पाहिजे
श्वासात माझ्या तुझा उश्वास भरावा
हात हाती तू माझा धरावा
आपणा पाहुनी चंद्रही हसावा
या पेक्षा सुखं अजून ते काय पाहिजे
पहाटेस हा पारिजातक बहरतो
सडा सांडुनी मंद दरवळतो
तुझ्याच प्रेमाने मी चिंब होतो
या पेक्षा सुखं अजून ते काय पाहिजे
तू मला प्रेमें आलिंगावे
अधरातुनी तुझ्या अमृत पाझरावे
तुझ्याच नशेत मी जगावे
या पेक्षा सुखं अजून ते काय पाहिजे
प्रसाद गोडांबे
Waah waah
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteEk number bhsu
ReplyDelete👌👍
ReplyDelete