तुझं रूप न्याहाळताना डोळ्यांनीच फितूरी केली
अलगद मनातले भाव सांगून प्रेमाची कबूली दिली
मात्र तुझ्या नजरेतले भाव ओळखण माझ्या नजरेला जमलच नाही
थोडस बिचकत,थोडस बाचकत मी तुझ्यावर प्रेम करत राहिलो
तुझं ही मन आता हळूहळू समजायला शिकलो
गालावरल्या खळी मागच लाजण जाणायला लागलो
अन् तुला मिठीत घेऊन चुंबण्याच स्वप्न उरात बाळगत राहिलो
पण परिस्थिती खलनायक बनून पुढे आली
आणि आपल्या दोघांत अदृश्य भिंत म्हणून उभी राहिली
सारं काही दिसत होतं , दोघांतली दरी मात्र रूंदावत राहिली
आयुष्याची नदी पुढे पुढे वाहातच होती
स्वप्नांना कवेत घेऊन मी किनारा बनून राहिलो
पैलतीरी तू तुझ्या संसाराच्या स्वप्नात धुंद होतीस
गालावरली खळी तुझ्या अजूनही खुलत होती
तुझं मन स्वप्नांच्या झूल्यात झूलत राहिलं
पण माझं तुला मिठीत घेऊन चुंबण्याच स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं
प्रसाद गोडांबे

No comments:
Post a Comment