तू नाराज आहेस हे मला समजतेय
पण तू का नाराज आहेस ते समजत नाही
घडला असाकाय गुन्हा हे उमगत नाही
केल्या अनेक विनवण्या आणि आर्जव
तू मात्र मागे वळूनही पाहत नाही
चुकले काय तेही सांगत नाही
कसं जगायचं सांग ना मी
कित्येक दिवसांत नजरेला नजर नाही
आणि तुझं मनमोहक स्मितही नाही
निदान एकदा तरी माझ्यासवे बोलना
कारण श्वासा शिवाय जीव नाही
आणि तुझ्या विना मी नाही
फक्त एकदा सांगून बघ
शिक्षेच फर्मान काढून बघ
तुझ्या शब्दा बाहेर मी नाही
तरी तू का नाराज आहेस ते समजत नाही
प्रसाद गोडंबे
पण तू का नाराज आहेस ते समजत नाही
घडला असाकाय गुन्हा हे उमगत नाही
केल्या अनेक विनवण्या आणि आर्जव
तू मात्र मागे वळूनही पाहत नाही
चुकले काय तेही सांगत नाही
कसं जगायचं सांग ना मी
कित्येक दिवसांत नजरेला नजर नाही
आणि तुझं मनमोहक स्मितही नाही
निदान एकदा तरी माझ्यासवे बोलना
कारण श्वासा शिवाय जीव नाही
आणि तुझ्या विना मी नाही
फक्त एकदा सांगून बघ
शिक्षेच फर्मान काढून बघ
तुझ्या शब्दा बाहेर मी नाही
तरी तू का नाराज आहेस ते समजत नाही
प्रसाद गोडंबे
ओह..धन्यवाद
ReplyDelete