Monday, 11 June 2018

प्रीती ...

सहज एकदा वाटलं ,
प्रीती वर ही कविता करावी
निर्मळ ,निरागस, निस्वार्थ स्वभावाला
मना पासून दाद द्यावी
कारण .....
असंख्य नात्यात रमते ही प्रीती
फुलपाखरा साठी फुलात जन्मते ही प्रीती
रीमझीम सरींनी निसर्ग सुखावते ही प्रीती
सरीता बनून सागर मिलना आतूरते ही प्रीती
विठ्ठला ठाई भक्तीत दंगते ही प्रीती
रुख्मिणीच्या मनाचा ठाव घेते ही प्रीती
मना मनात असते ही प्रीती
कधी व्यक्त तर कधी अव्यक्त ही प्रीती ...

                               प्रसाद गोडांबे 

No comments:

Post a Comment